दानपेटी चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात

By Raigad Times    09-Jun-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणातील एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेरळ येथील गणपती मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी ५ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता.
 
गणपती मंदिरातील स्टीलच्या दानपेटीत अंदाजे तीस हजार रुपये होते ही रक्कम चोरी झाल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले होते. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून करून गुन्ह्यामध्ये एक १५ वर्षाचा अल्पवयीन मुलगा रा. शेलू याने ही चोरी केल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यानुसार त्याच्या पालकांना विश्वासात घेऊन चोरी केलेली दानपेटी व वीस हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.