भारत गौरव टुरिस्ट ट्रेन आज माणगावात , पर्यटक पहिल्या दिवशी देणार रायगड किल्ल्याला भेट

By Raigad Times    09-Jun-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे.
 
ही यात्रा ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ अंतर्गत आज, ९ जूनपासून सुरू होत असून पहिल्या दिवशी रायगड किल्ला येथे भेट देणार आहत. या पाच दिवसांच्या विशेष प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. या विशेष रेल्वेचे आज सकाळी साडेदहा वाजता माणगाव रेल्वेस्थानक येथे आगमन होणार आहे. सर्व प्रवासी रायगड किल्ले येथेभेट देणार आहेत.
 
सायंकाळी ५ वाजता रेल्वेने पुणे कडे प्रयाण करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणारी ही रेल यात्रा रायगड, पुणे-शिवनेरी, भीमाशंकर, प्रतापगड, कोल्हापूरपन्हाळा व पुन्हा मुंबई असा हा प्रवास होणार आहे.