स्वप्नीलने नेव्हीमध्ये मिळविले तीन मानाचे सन्मान

07 Jun 2025 18:21:16
 mhasla
 
म्हसळा | रायगड जिल्ह्यात होत आहे कौतुक. न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज म्हसळा चा एक प्रामाणिक शिपाई देवा घावट यांचा मुलगा स्वप्नील देवा घावट याने नेव्ही मध्ये रँक वन, बेस्ट शिप मेट, बेस्ट कॅडेट इन मराईन प्रात्यक्षिक हे तीनही मानाचे सन्मान पटकावत न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा, आपले कुटुंबीय आणि आपल्या संपूर्ण रायगड जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
 
न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा येथील शिपाई देवा काका यांचा सुपुत्र असलेल्या स्वप्नीलला लहानपणीच शाळेमधून मिळालेलं योग्य मार्गदर्शन आणि त्यातूनच त्याची नवोदय विद्यालयात निवड झाली. हीच त्याच्या आयुष्यातील पहिली मोठी संधी ठरली. नवोदयमधील शिक्षण, शिस्त, स्वावलंबन आणि मूल्यशिक्षण यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वात आश्चर्यकारक बदल झाले. म्हसळा येथे शालेय शिक्षण पूर्ण करून त्याने लोणावळा (महाराष्ट्र) येथील मरीन स्टडीज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
 
तिथे त्याने कठोर परिश्रम, निष्ठा आणि शिस्तीच्या जोरावर आपली चमक दाखवत हे घवघवीत यश संपादन केलं. प्राचार्य डी.आर. पाटील, स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन समीर बनकर, सर्व स्कूल कमिटी पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्यातर्फे स्वप्नील देवा घावट याचे मनः पूर्वक अभिनंदन करून त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 
 
Powered By Sangraha 9.0