न्यायासाठी संतोष देशमुख कुटुंबियांचे छत्रपती शिवाजी महाराजांना साकडे

07 Jun 2025 16:30:46
 mahad
 
महाड | बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि बंधू धनंजय देशमुख हेदेखील रायगडवर आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी अभिवादन केले.
 
स्व. देशमुख यांचा निर्घृण खून करणार्‍या वाल्मिक कराड आणि अन्य गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, असे साकडे महाराजांसमोर घातल्याचे वैभवी देशमुख हीने माध्यमांशी बोलताना सांगितले.
मनोज जरांगेदेखील नतमस्तक
मराठ आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे देखील शुक्रवारी रायगडवर आले होते. राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांनी महाराजांसमोर नतमस्तक होऊन त्यांना वंदन केले. राज्याभिषेक सोहळ्याला मात्र ते उपस्थित राहिले नाहीत.
Powered By Sangraha 9.0