माथेरान अमन लॉज शटल मिनीट्रेन सेवेला प्रतिसाद

07 Jun 2025 18:13:43
 matheran
 
कजर्त | पर्यटकांची लाडकी मिनी ट्रेन म्हणजे माथेरान राणीची अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा पर्यटकांच्या पसंतीला उतरली आहे. शटल सेवा पावसाळ्यात देखील सुरू राहणार असून नेरळ माथेरान मार्गावर चालविली जाणारी मिनी ट्रेन पावसाळी सुट्टीवर गेली आहे.
 
मध्य रेल्वे माथेरान ते अमन लॉज नेरळ या मार्गावर चालविली जाणारी प्रवासी सेवा पावसाळ्यात बंद ते अन्याय येते. त्याप्रमाणे यावर्षी एक जून रोजी मिनी ट्रेनची नेरळ माथेरान नेरळ मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. यावर्षी २६ मे पासून अतिवृष्टी असल्याने प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती.
 
त्यानंतर एक जून पासून १५ ऑटोबर पर्यंत मिनी ट्रेनची प्रवासी वाहतूक बंद केली आहे. मात्र पावसाळ्यात माथेरान ते अमन लॉज दरम्यान मिनी ट्रेनची शटल सेवा सुरूच राहणार आहे.माथेरान अमन लॉज मार्गावर आठवड्याच्या दिवशी सहा फेर्‍या आणि शनिवार/रविवारी आठ फेर्‍या सेवा चालवणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0