क्रिप्टो करन्सीच्या नावे एक कोटीची फसवणूक करणार्‍याला बेड्या

07 Jun 2025 17:06:17
 panvel
 
नवीन पनवेल | क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा देण्याच्या बहाण्याने एक कोटी तीन लाखांची फसवणूक करणार्‍या भामट्याला सायबर सेल पनवेलने अटक केली. जुबेर शमशाद खान (वय ३४ राहणार-विजयनगर कुर्ला अंधेरी) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.
 
या भामट्याने फेसबुक वर क्रिपटो करन्सीमधून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष देणारी पोस्ट करून व्हॉट्सअ‍ॅपवर फिर्यादीला खोटी ओळख आणि फोटो पाठवला. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंतवून ७८ लाख ८२ हजार ६८४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
या गुन्ह्याच्या तपासात सायबर सेल पनवेल यांनी भामट्याला मुंब्रा येथून शिताफीने ताब्यात घेऊन ४ जून रोजी अटक करण्यात आली. या भामट्याकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला असून तपासामध्ये आरोपीने फिर्यादीकडून एकूण एक कोटी तीन लाख रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0