पावसामुळे पडझड झालेल्या घरांच्या पुर्नबांधणीसाठी सरकारची मदत कोकणास ५ कोटी मंजूर

04 Jun 2025 16:56:15
 mumbai
 
मुंबई | राज्यातील विविध भागात पावसामुळे कापणी घरांची पडझड झाली आहे. अशा घरांच्या पुर्नबांधणीसाठी ४९ कोटी मंजूर करण्यात आले असून कोकण विभागाला ५ कोटी मंजूर करण्यात आले आहे. तसेच नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली.
 
या बैठकीच्या सुरुवातीला राज्यात झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला गेला. या बैठकीत घरांच्या पडझडींच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीकरीता तातडीने मदतीकरीता निधी द्यावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार ४९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. कोकण विभागास पाच कोटी, पुणे विभागास १२ कोटी, नाशिक विभागास पाच कोटी, छत्रपती संभाजीनगर विभागास १२ कोटी, अमरावती विभागास पाच कोटी आणि नागपूर विभागास दहा कोटी असे एकूण ४९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
 
दरम्यान , वन मंत्री गणेश नाईक आणि बंदरे विकास मंत्री निलेश राणे यांनी पावसामुळे सुकी मासळीचे नुकसान झाले आहे. त्यांनी मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावर मदत व पुनर्वसन विभागाने यावर प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
 
Powered By Sangraha 9.0