पनवेलमध्ये रुग्णालयासाठी शासकीय जमीन देण्यास तत्वतः मंजुरी

04 Jun 2025 20:16:04
 panvel
 
पनवेल | कामगार विमा महामंडळाला रायगडसह राज्यातील अन्य महामंडळांच्या प्रस्तावित ९ रुग्णालयांना जमीन देण्यास मान्यता सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील २०० खाटांच्या रुग्णालयासाठी करोडीतील ५ एकर जमीन देण्यास मान्यता देण्यात आली.
 
छत्रपती संभाजीनगर येथे राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालयासाठी १५ एकर जमीन देण्यास मंगळवारी (३ जून) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
 
पनवेल (रायगड) बिबवेवाडी (पुणे), अहिल्यानगर, सांगली, अमरावती, बल्लारपूर (चंद्रपूर), सिन्नर (नाशिक), बारामती (पुणे), सातारा येथील प्रस्तावित रूग्णालयांसाठीही शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली.
Powered By Sangraha 9.0