प्रफुल्ल पटेल झाले विराट कोहलीचे शेजारी! अलिबाग येथे घेतली दोन एकर जागा

28 Jun 2025 16:45:07
 alibag
 
अलिबाग | मुंबईपासून जवळ असलेले, निसर्गसंपन्न अलिबागमध्ये जागा खरेदी करणार्‍या दिग्गजांमध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे. माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान राज्यसभा सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आवासमधील अलिबाग हिल्स येथे २ एकर जागा विकत घेतली असून, समिरा हॅबिटॅट्सने हा व्यवहार केला आहे.
 
ही जागा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचे शेजारीच आहे. अलिबागमधील उच्चभ्रू घरमालकांच्या वाढत्या समुदायामध्ये लक्षणीय भर घालत, विद्यमान राज्यसभा सदस्य असलेले प्रफुल्ल पटेल यांनी अलिबाग हिल्समधील २ एकरचा भूखंड खरेदी केला आहे. अलिबाग हिल्स आवास येथील ही जागा त्यांनी समीरा हॅबिटॅट्सकडून खरेदी केली आहे.
 
विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेली ही जागा भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याच्या जागेशेजारीच आहे. विराटनेही २०२२मध्ये समीरा हॅबिटॅट्सकडून ही जागा खरेदी केली होती. शांत, निसर्गसंपन्न अलिबागची भुरळ बॉलिवूडचा किंग शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या जागा अलिबागमध्ये आहेत. मुंबईपासून जवळ असल्याने अलिबाग नेहमीच सेलिब्रिटींपासून पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण बनले आहे. त्यात आता प्रफुल्ल पटेल यांचेही नाव जोडले गेले आहे.
Powered By Sangraha 9.0