पनवेल शहरातील महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करणारा अटकेत

25 Jun 2025 19:17:14
 panvel
 
नवीन पनवेल | पनवेल शहरातील महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करणार्‍याला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. शैलू उर्फ गोलापंडित अशोक शुक्ला (वय ३८, रा.करंजाडे, मूळ उत्तरप्रदेश) असे त्याचे नाव आहे.
 
२३ जून रोजी सकाळी दहाच्या सुमारास तो पनवेल शहरातील महापुरुषाच्या पुतळ्याला धरून आरडाओरडा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला खाली उतरवले आणि त्याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १९६, २९८, २९९ आणि अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करुन, त्याला ताब्यात घेतले.
 
 
Powered By Sangraha 9.0