खालापूरातील बेपत्ता इसमाचा लोणावळ्यात सापडला मृतदेह

20 Jun 2025 18:52:51
 KHOPOLI
 
खोपोली | खालापूर येथून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह लोणावळा येथे सापडला आहे. या व्यक्तीची हत्या झाल्याचा संशय असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आजिवली (पो. डोणवत) येथील हनीफअली सहाजमाल शेख उर्फ सोनू हा इसम खालापूरातून अचानक बेपत्ता झाला होता.
 
२६ मे रोजी हनीफअली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. तपासादरम्यान, लोणावळा पोलिसांना हनीफअली याचा मृतदेह सापडला. हनीफअलीच्या अंगावर संशयास्पद खुना आढळून आल्या असून त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चौकशीसाठी एका संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0