म्हसळा | वारळच्या महिला सरपंचाकडून ग्रामस्थाविरोधात अब्रूनुकसानीची तक्रार

19 Jun 2025 19:46:50
 mhasla
 
म्हसळा | तालुयांत वारळ गावच्या महिला सरपंच यांनी स्थानिक ग्रामस्थाविरुध्द म्हसळा पोलिसांत अब्रु नुकसानीची तक्रार केली आहे. या ग्रामस्थावर म्हसळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७, ८, ७९, ३५२, ३५६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एच.सी नवनाथ देवढे हे करीत आहेत, याबाबत पोलिसांकडे चौकशी केली असता, आम्ही गुन्हेगाराच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले. गावच्या दप्तर तपासणीवेळी या ग्रामस्थाने काढलेले व्हिडीओ विस्तार अधिकारी व सदस्यांना दाखवून अब्रू नुकसानी केल्याची तक्रार या महिला सरपंचांनी १३ जूनला दाखल केली.
 
ग्रामपंचायत विभागाकडे आमच्या प्रतिनिधींनी चौकशी केली असता गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ग्रामस्थासह इतर ग्रामस्थ वारळ यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९ अन्वये सरपंच आणि उपसरपंच यांच्यावरील गैरवर्तवणूक व ग्रामपंचायत फंड अपहाराबाबत गुन्हा दाखल करणेबाबत तसेच जनतेच्या हिताची कामे न करणे आणि अन्य तक्रारी बाबत ३० मे रोजी तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची पोर्शभूमी पोलिसांनी तपासणे आवश्यक असल्याचे मत एका जेष्ठ ग्रामस्थाने मांडले. आमच्या वारळची स्थिती अगदीच विचित्र आहे असे सांगत उपसरपंच आणि एक सदस्य ग्रामपंचायतीचा कारभार चक्क मुंबईवरुन हाताळतात असेही सांगितले.
Powered By Sangraha 9.0