श्रीवर्धन | श्रीवर्धन तालुक्यातील कारिवणे येथील धबधब्याचा आनंद लुटण्यास गेलेल्या तुरुणाचा खोल डोहात बुडून मृत्यू झाला. अनिस कैसर राऊत असे त्याचे नाव असून तो १८ वर्षांचा होता. वाळवटी येथे राहणारा अनिस हा मंगळवारी (१७ जून) दुपारच्या वेळेस त्याच्या तीन मित्रांसोबत कारिवणे येथील एका धबधब्यावर पोहायला गेला होते.
धबधब्याच्या प्रवाहाच्या खोल डोहात अनिसने उडी मारली असता त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडायला लागला. यावेळी त्याच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर गावांतील तरुण व त्याच्या मित्रांनी अनिसला बाहेर काढले मात्र तो मृतावस्थेत सापडला.
मृतदेह शवविच्छेदनाकरिता श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अनिस हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. श्रीवर्धन तालुक्यातील शेवटच्या टोकाला दुर्गम भागात असलेले कारिवणे गाव. या गावाशेजारी असलेल्या नदीवरील धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी अनिस मित्रांसोबत गेला आणि त्याच्या जीवावर बेतले.