नो पार्किंग झोनमधील वाहनांवर रोहा पोलिसांची मोठी कारवाई

13 Jun 2025 18:17:20
 roha
 
धाटाव | रोहा शहरात रोहा पोलिसांकडून दि. ११ जून रोजी रोहा येथील मुख्य रस्त्यावर पायी पेट्रोलियम करण्यात आली. यावेळी उभे असणार्‍या नो पार्किंगमध्ये उभ्या असणार्‍या २१ वाहनांवर कारवाई करत सुमारे १४ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करत दररोज पाईप पेट्रोलियम करण्यात येणार आहे.
 
  तरी कोणीही नो पार्किंगमध्ये वाहन उभे करू नये अथवा कारवाई करण्यात येईल असे आवाहन केले. त्याचप्रमाणे रोहा पोलिसांकडून तालुयातील वेगवेगळ्या सोसायटी, वसाहतींमध्ये जाऊन नागरिकांना सुरक्षितेबद्दल आवाहन करून सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १६ पोलीस अंमलदार व २ वाहतूक पोली--स उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0