आ. महेंद्र दळवी यांनी केली नांदगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची पाहणी

13 Jun 2025 20:04:30
 korlie
 
कोर्लई | अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी नुकतीच मुरुड तालुयातील नांदगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य पथक उपकेंद्राची पाहणी करुन समस्या जाणून घेतल्या. आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची दूरवस्था पाहून त्यांनी नवीन इमारत बांधकाम होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात ओशासन दिले.
 
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, युवा सेना विभाग प्रमुख अविनाश शिंदे, कामगार सेना तालुका अध्यक्ष दिनेश मिणमिणे, बाबू सुर्वे, योगेश जयस्वाल, आविष्कार कांबळे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र दिवेकर, विशाल पाटील, अशोक पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल कंधारे, कर्मचारी वृंद, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0