अलिबाग | शहापूर, ता.अलिबाग येथील भूखंड धारक मे.एपीपीसिनारमस कंपनी लि. यांना सध्याच्या रस्त्यावरून तात्पुरता पोहच रस्ता देण्याकरिता संपादन होणार्या क्षेत्राचे मोबदला देण्याचे काम उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयात सुरू असून सर्व बाधित खातेदारांनी २० जूनपर्यंत संमती करारपत्र दाखल करावे असे, आवाहन उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण यांनी केले आहे.
शहापूर येथील जमीन शहापूरधेरंड औद्योगिक क्षेत्र व धेरंड शहापूर औद्योगिक क्षेत्राकरिता पोहच रस्त्याकरिता संपादीत होत आहे. तसेच भूखंडधारक मे. एपीपीसिनारमस कंपनी लि. यांना सद्याच्या रस्त्यावरून तात्पुरता पोहच रस्ता देणेकरिता एकूण २.९६.४० हे.आर. क्षेत्र संपादीत करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रति एकरी रूपये ९६ लाख ६९ हजार ५५४ म्हणजेच रू. २ कोटी ४१ लाख ७३ हजार ८८६ प्रती हेक्टर एवढया दरास संमती दिलेली आहे.
त्या अनुषंगाने प्रकल्पामध्ये संपादन होणार्या जमिनीतील बाधीत खातेदार यांना करारपत्राद्वारे रक्कम स्विकारणे कामी म.औ.वि. अधिनियम १९६१ मधील कलम ३३(३) अन्वये नोटीसा या कार्यालयामार्फत बजाविण्यात आल्या आहेत. यार नोटीसांना प्रतिसाद देऊन काही खातेदारांनी उपविभागीय अधिकारी अलिबाग यांचे कार्यालयात संमती करार पत्र सादर केले आहेत. त्यानुसार संमती दिलेल्या खातेदारांची संपादीत होणार्या क्षेत्राची मोबदला रक्कम आरटीजीएस, एन.ई.एफ.टी. द्वारेखातेदारांच्या बँकखाती जमा करण्यात आली आहे. ज्या खातेदारांना मंजुरी दिलेला दर मान्य असेल त्यांनी आपले संमती करारपत्र उपविभागीय अधिकारी अलिबाग यांचे कार्यालयात समक्ष उपस्थित राहून सादर करावे.