महाराष्ट्रात आज युद्धाची मॉकड्रील , रायगडात उरणमध्ये होणार "ऑपरेशन अभ्यास”

07 May 2025 13:07:21
 alibag
 
अलिबाग | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला. केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (७ मे) मॉकड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा? सुरक्षित ठिकाणी कसे जाव? इमारतींखाली कसे जमा व्हावे? याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. उरण येथे "ऑपरेशन अभ्यास” या मॉकड्रिलचे आयोजन ७ मे रोजी दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे.
 
नागरिकांनी घाबरु नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. संध्याकाळी ४ वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल. उरण शहरातील खालील सात ठिकाणी सायरन बसविण्यात आले आहेत.
 
तहसिल कार्यालय उरण, ओएनजीसी कॉलनी, ग्रुप ग्रामपंचायत चाणजे, जीटीपीएस कंपनी, बोकडविरा, बारमर लॉरी, भेंडखळ, ऑल कार्गो कंपनी, कोप्रोली, बल्क गेट कंपनी, मोरा यादरम्यान एन.आय. स्कूल, पंचायत समिती, उरण येथे आग लागल्याच्या बनावावर आधारित मॉकड्रिल होणार असून नागरी संरक्षण दल, वैद्यकीय पथक व इतर आपत्कालीन सेवांकडून बचावकार्य, शोध मोहिमा व नागरिकांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
 
सायंकाळी उरण शहरातील काही भागांमध्ये ५ मिनिटांसाठी ब्लॅक आऊट (प्रकाश व्यवस्था बंद) करण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मॉकड्रील ही केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही, हे लक्षात घ्यावे. जिल्ह्यात इतर कोणत्याही ठिकाणी मॉकड्रील आयोजितकरण्यात आलेली नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
 
 
Powered By Sangraha 9.0