खारघर | कब्रस्तानच्या जागेचा अनधिकृत वापर , आ. प्रशांत ठाकूर यांची पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी

28 May 2025 18:55:06
 panvel
 
पनवेल | खारघर मधील सेटर १४ येथील कब्रस्तानासाठी सिडकोने दिलेल्या जागेचा वापर अवैधपणे मशिद व अन्य धार्मिक कार्यक्रमारकरिता करण्याबरोबरच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेल्या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांच्याकडे केली.
 
सिडकोने कब्रस्तानासाठी दिलेल्या जागेचा हेतुपुरस्सर अनधिकृतरीत्या मशिद व धार्मिक कार्यक्रमांसाठी वापर केला जात असल्याच्या गंभीर तक्रारींच्या पोर्शभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिष्टमंडळासह भेट घेत या गंभीर विषयावर पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांचे लक्ष वेधले. या शिष्टमंडळात त्यांच्यासोबत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर शहर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, युवा मोर्चा खारघर अध्यक्ष नितेश पाटील, विेश हिंदू परिषदेच्या प्रसन्ना धर्माधिकारी, क्रिश्ना बांदेकर, हिंदू जागरण मंचचे शिवम सिंग, आदींचा समावेश होता. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पोलीस आयुक्तांना निवेदनही दिले. या निवेदनातून विषयाचे गांभीर्य त्यांनी अधोरेखित केले.
 
खारघर सेटर १४ येथील जागा सिडकोने कब्रस्तास्तानाकरिता राखीव ठेवली असतानासुद्धा सदर जागेचा वापर हा हेतुपुरस्सररित्या मशीद महणून केला जात असून सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नमाज पठण व इतर धार्मिक कार्यक्रमाचे नियमितपणे आयोजन होत असल्याचे निदर्शनात आले असून हे अत्यंत चुकीचे व संतापजनक आहे. या प्रकारांमुळे सदर परिसरातील सामाजिक सलोखा धोयात आला असून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या परिसरात मुस्लीम समाजाची लोकवस्ती नसतानादेखील मुद्दामून हेतुपूर्वक या सर्व गोष्टी केल्या जात आहेत.
 
जाणीवपूर्वक मुस्लीम समाजातर्फे या कब्रस्तानच्या जागेचे कब्रस्तान मशीद असे संबोधन केले जाते व याठिकाणी नमाज पठणाकरीता तसेच धार्मिक कार्यक्रमाकरीता त्या समाजातील लोकांना बोलावले जात असल्याचे लक्षात आले आहे. तसेच या भूखंडावर कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता मोठयाप्रमाणात नमाजाकरीता सभागृह तसेच स्वच्छतागृह बांधण्यात आलेली असून त्याकरीता प्रचंड खर्च करून ग्रॅनाईट व मार्बलचा वापर केला आहे.
 
एवढे सगळे अनधिकृत बांधकाम होत असताना सिडको प्रशासन व पोलीस प्रशासन यापैकी कुणालाही याबाबत अजिबात काही माहिती मिळत नाही व त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही हे आश्चर्यकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच मध्यंतरी याच खारघर परिसरात या समाजाच्या इज्तिमा कार्यक्रमानंतर एक हिंदू बांधवाला जीवे मारण्याचा अनुचित प्रकार घडले आहे. त्यानंतर या परिसरांत प्रचंड तणाव निर्माण झाला होता व सामाजिक परिस्थिती पूर्णपणे विस्कळीत होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
 
या घटनेमुळे दोन्ही समाजांत प्रचंड तेढ निर्माण झाली होती व दंगलसदृष्य परिस्थिती झाली होती. त्यावेळी परिस्थिती आटोयात आणण्याकरिता पोलिस प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना अथक परिश्रम घ्यावे लागले होते. अशातच आता सेटर १४ मधील कब्रस्तानच्या जागेचा अवैधरित्या मशिद व धार्मिक कार्याकरीता जो विनदिक्कत वापर होत आहे त्याबद्दल अन्य समाजात प्रचंड राग आहे व त्यासंदर्भात तेथील स्थानिक पदाधिकारी व नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा प्रशासनामार्फत अद्यापही कोणतीच कारवाई केली जात नाही, हे खेदजनक आहे.
 
त्यामुळे प्रशासनातर्फे अजुनही दिरंगाई झाली तर त्या ठिकाणी दोन्ही समाजांमध्ये काहीतरी अनुचित प्रकार होऊन सार्वजनिक शांतता बिघडण्याची व कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शयता आहे. वारंवार तक्रारी करूनही कब्रस्तानसाठी दिलेल्या जागेवर खारघरचे रहिवासी नसलेल्या लोकांकडून नमाज पठण केले जाते व त्याच माध्यमातून एका समाजाला सातत्याने डिवचण्याचा प्रयत्न करणे हे प्रकार थांबविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करून कब्रस्तानाचे अवैधरित्या मशिदीत रूपांतर करणार्‍या संबंधित ट्रस्टींवर व त्यांना पाठबळ देणार्‍या व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांच्याकडे केली आहे.
Powered By Sangraha 9.0