राजकारण नशिबाचा खेळ, मंत्री भरत गोगावले यांची मिश्किल टिप्पणी

27 May 2025 18:20:39
 kokan
 
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
 
पत्रकारांनी गोगावले यांना, मागच्या वेळी तुम्ही कोट शिवून ठेवला होता, पण मंत्रीपद मिळाले नाही. आता आमदार दीपक केसरकर कुठेतरी वंचित राहिले असे वाटते का?ङ्घ असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना गोगावले म्हणाले, मी मागच्या वेळी कोट शिवून ठेवला होता, पण मला मंत्रीपद मिळाले नाही. तेव्हा तो कोट मी दीपक केसरकर यांना दिला.
 
आता त्यांनी तो कोट मला परत दिला आहे. त्यांनी माझी परतफेड केली. राजकारणात नशिबाचे महत्त्व अधोरेखित करताना ते पुढे म्हणाले, राजकारणात नशिबाची गोष्ट आहे! तुम्ही त्यांना (दीपक केसरकर) विचारा, मागच्या वेळी मी त्यांना कोट दिला की नाही. आता पाहू अडीच वर्षांनी काय होतं ते त्यांच्या या प्रतिक्रियेुळे उपस्थितांध्ये हास्याचे वातावरण निर्माण झाले.
 
 
Powered By Sangraha 9.0