अलिबाग | रविवारी पावसाने रात्रभर झोप उठविल्याने सोमवारी सकाळी पोलादपूर तहसिल कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये गेल्या चोवीस तासांत पावसाची ९४ मि.मी. नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली. रविवारी दिवसभरामध्ये दोन घरांचे नुकसान झाल्याचे तसेच तालुयातील पोलादपूर महाबळेेशर वाई सुरूर रस्त्यावर सुरू असलेल्या रस्तारूंदीकरणावर झाडं कोसळल्याच्या घटना झाल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
यामुळे पोलादपूर महाबळेेशर वाई सुरूर आंबेनळी घाटरस्ता पावसाळयात असुरक्षित झाला असूनही याबाबत संबंधित यंत्रणांनी दुजोरा न दिल्याने या घाटातून वाहतूकीदरम्यान मोठया अपघाताला सामोरे जावे लागल्याशिवाय या धोयावर शिक्कामोर्तब करण्यात येणार नाही हे उघड झाले आहे.
२३.८ किमीच्या रस्त्याचे रुंदीकरण
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ रायगडम धील पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेेशर सुरूर दरम्यान २३.८ किमी लांबीचा रस्ता (राज्य महामार्ग-१३९) रुंदीकरण प्रकल्प राबवत आहे. प्रस्तावित १० मीटर ते १८ मीटर रुंदीचे काम अंदाजे १०८कोटी रुपये खर्चाने राबविण्यात येत आहे.
सध्याच्या रस्त्याची रुंदी ५.५ मीटर ते ७ मीटर दरम्यान आहे. प्रस्तावित रस्ता चार प्रकारांध्ये विभागलेला आहे: ७.८२० किमी लांबीचा खुला, १.९५० किमी लांबीचा बांधलेला, २.५०० किमी लांबीचा वन क्षेत्रातून आणि डोंगरदर्यांतून ११.५३० किमी लांबीच प्रस्तावित रस्ता पोलादपूर तालुयातील पोलादपूर, कापडे बुद्रुक, आड-चांभारगणी, किनेेशर, पायटे, कुंभळवणे, कापडे खुर्द, दाभिळ आदी ८ गावां ध्ये पसरलेला आहेत.