खोपोली | मुंबई-पुणे एस्प्रेस मार्गावर शनिवारी (२४ मे) सायकाळच्या सुारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव ट्रेलरने सात वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. तर, चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. खोपोलीनजीकचा बोरघाट हा सातत्याने ’मृत्यूचा- घाट’ ठरत आहे.
शनिवारी सायंकाळच्या सुारास बोरघाटातील मुंबईकडे जाणार्या तीव्र उतारावर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये, मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रेलरवरील चालकाचा ताबा सुटल्याने पुढे जाणार्या बस आणि कारला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला होता. तर, या अपघातात दोन बस आणि चार कारला धडक बसल्याने अपघात झाला होता.
या अपघातात ट्रेलरने पुढे जाणार्या स्विफ्ट कारला धडक दिल्याने ती कार पुढे जाणार्या खाजगी बस आणि ट्रेलरच्या मध्ये चिरडली गेल्याने कारमधील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, या अपघातात स्विफ्ट कारचा चुराडा होऊन ट्रेलरने बाजूने जाणार्या कारलादेखील धडक दिली. तर, बोरघाटातील तीव्र उतारावर झालेल्या या अपघातात पाच कार, दोन बसेस आणि ट्रेलरचे नुकसान झाले असून चार प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि मदतीसाठी धावणार्या सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अपघातात १७ वर्षीय श्रेया अवताडे आणि अिेशनी हळदणकर (३० वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. तर, या अपघातात कोल्हापूर येथील वसुधा जाधव (३६ वर्षे) यांच्यासमवेत त्यांच्या सारिका विजय जाधव (९ वर्षे) आणि अवनीश विजय जाधव (३ वर्ष) या मुली जखमी झाल्या आहेत.
तर, मुंबईतील घाटकोपर येथील सारिका अवतारे (३८ वर्षे) ह्या जखमी झाल्या असून त्यांना नवी मुंबईतील कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, अक्षय हळदणकर या जखमीला खोपोली येथील जखोटिया या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विवेक रावळ यांनी सांगितले आहे.