वासरे-पळसदरीला जोडणारा पूल रेल्वे बनविणार , खा. श्रीरंग बारणे यांच्याकडून आश्वसन

26 May 2025 16:51:02
KARJT
 
कर्जत | कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावर असलेले रेल्वे स्थानक पळसदरी यांना जोडणारा पूल बांधण्याची मागणी रेल्वे करण्यात आली होती. या पुलाच्या बांधणीचे कामाचे ओशासन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले होते. त्यानंतर अगदी दुसर्‍याच दिवशी शिवसेना भाजप पदाधिकारी यांनी वासरेपळसदरी पूल बांधण्यासाठी जागेची पाहणी केली.
 
वासरे खोंड्याला कर्जत आणि पळसदरी येथून खोपोली रस्त्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणारा आवळस नेवाळी ते पळसदरी रेल्वे ओव्हर ब्रिज लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. यासाठी गेल्या काही काळापासून विविध राजकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे कर्जत रेल्वे स्थानकाच्या भेटीत शिवसेना आणि भाजप पदाधिकारी यांनी ही समस्या मांडली.
 
त्यावेळी खासदार बारणे यांनी त्या पुलाचे कामाला तत्काळ मान्यता देण्यात येईल असे ओशासन दिले होते. त्यानंतर भारतीय जनता पार्टी, शिवसेना पदाधिकारी, गावकरी आणि रेल्वेचे अधिकारी एकत्र येत पळसदरी स्टेशन येथे प्रत्यक्ष पाहणी केली. खासदार बारणे यांनी या पुलासाठी आपण स्वतः रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यावर रेल्वे मंत्रालयाने कळवले की महाराष्ट्र शासन ५० टक्के व रेल्वे ५० टक्के खर्च करण्याच्या अटींवर प्रस्ताव सादर करावा असे पत्राद्वारे कळविले होते.
 
या ब्रिजच्या उभारणीने वासरे खोंड्याच्या नागरिकांना आठ किलोमीटरचा फेरा वाचणार असून, खोपोली-लोणावळ्याकडे जाण्याचा मार्ग सुकर होणार आहे. आज रेल्वेचे इंजिनियर कदम यांनी शिवसेना भाजप युतीचे पदाधिकारी यांच्यासह जागेची पाहणी केली. त्यावेळी रेल्वे अभियंता कदम यांनी लवकरच याचे इस्टिमेट आणि फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करून प्रस्ताव सादर केला जाईल असे सांगितले.
 
यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली व जनतेच्या दृष्टीने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. या पाहणी प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा सुनील गोगटे, भाजपा कर्जत तालुका माजी सरचिटणीस वसंत महाडीक, तसेच अ‍ॅड सचिन दरेकर, शुभम शिंदे, सुरज दळवी पत्रकार अभिजीत दरेकर, रघुनाथ निगुडकर, प्रकाश सुर्वे, नरेंद्र दरेकर, सेनेचे उप तालुका प्रमुख अ‍ॅड. प्रदीप सुर्वे, आदी तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. वासरे-खोंड्याच्या जनतेसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे अशी भावना संतोष भोईर यांनी व्यक्त केली.
 
 
Powered By Sangraha 9.0