गोवंशीय कत्तल करणार्‍या सराईताला पेण पोलिसांकडून अटक

21 May 2025 20:13:13
 pen
 
पेण | सावरसई येथे गोवंशीय मास कत्तल करणार्‍या मुख्य आरोपीला पेण पोलिसांकडून कोपरगाव जिल्हा अहिल्या नगर येथून अटक करण्यात आली आहे. १५ डिसेंबर रोजी सकाळी ६:४४ वाजता पेण-खोपोली मार्गवरील सावरसई गावाच्या हद्दीत टाटा इंट्रा कंपनीच्या टेंम्पोमध्ये गोवंशीय मांस कत्तल करून मांसाची वाहतूक करत असताना आढळून आले होते.
 
यातील अफसर मेहबुब कुरेशी, नजरूद्दीन निजामुद्दीन खान, साजिद लायक कुरेशी, सर्व रा.कुर्ला, मुंबई यांना गुन्हयात अटक करण्यात आली होती. सदर मांस हे इसा कुरेशी रा.वैजापुर, जि.संभाजीनगर याचेकडून आणले असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर इसा कुरेशी हा गेले ५ महिन्यांपासून फरार होता.
 
गोपनिय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखा पेण यांनी शोध घेऊन फरार इसा युसुफ कुरेशी हा कोपरगांव जि.अहिल्यानगर येथील मार्केटमध्ये आला असल्याची बातमी मिळाली असता त्यास सापळा रचून ताब्यात घेऊन १९ मे रोजी अटक केली. हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अशाप्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
Powered By Sangraha 9.0