योगेंद्र विरकर यांना वन्यजीव मित्र पुरस्कार

20 May 2025 20:19:06
 pen
 
पेण | इंडियन नॅचरल हनीबीज पुणे आणि सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट शिवाजीनगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २० मे रोजी जागतिक मधमाशी दिनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मधमाशी पालन व जनजागृती करणार्‍या व्यक्तीला मधमाशी मित्र पुरस्कार तसेच जैवविविधतेच्या संवर्धनासाठी दिलेल्या प्रेरणादायी कार्याबद्दल सर्पमित्रांना वन्यजीव मित्र पुरस्कार देण्यात येणार आहे.
 
यावेळी पेण तालुयातील सर्पमित्र योगेंद्र वीरकर या धाडसी युवकाने अनेक वन्यजीवांना जीवनदान दिल्याबद्दल वन्यजीव मित्र पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. सदर पुरस्कार समारंभ दि. २० मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत खादी आणि ग्रामउद्योग आयोग विलेपार्ले मुंबई येथे संपन्न होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0