बोरघर/माणगाव | मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या सर्व विभागांसाठी एक महत्वकांक्षी १०० दिवसांचा सातकलमी कार्यालयीन सुधारणा विशेष कृती आराखडा उपक्रम हाती घेतला होता. या १०० दिवसांच्या धोरणात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक योजना, विकासाची कामे, अनेक प्रकल्प मार्गी लावण्याची संकल्पना मांडली होती.
नुकताच या १०० दिवसांच्या कामांचा अहवाल राज्य सरकारने सादर केला आहे. या १०० दिवसांच्या कार्यक्रमात माणगाव तालुयाच्या शिक्षण विभागाने अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली होती. याचाच परिणाम म्हणून शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती माणगाव ला कोकण विभागातून द्वितीय क्रमांक मिळालेला आहे.
या यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांचे व त्यांच्या संपूर्ण शिक्षण विभागाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्वच तालुका स्तरावरील अधिकार्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.