नवीन पनवेल | महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात या पोलीस उपनिरीक्षकाच्या आईलाही सहआरोपी करण्यात आले आहे. मार्च २०२० मध्ये पोलिस उपनिरीक्षकाची ओळख तो तळोजा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना पीडित महिला पोलिसासोबत झाली.
त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि मार्च २०२० मध्ये चहा पिण्याच्या बहाण्याने त्याच्या भावाच्या महालक्ष्मीनगर, नेरे येथील रूमवर नेऊन चहामध्ये गुंगीकारक औषध टाकले आणि पोलीस महिलेसोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून तिचे अर्ध नग्न फोटो काढले आणि हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पोलीस ठाण्यात तक्रार केली तर आत्महत्या करेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धमया दिल्या.
तसेच त्यांना लग्न करण्याचे ओशासन दिले. एप्रिल २०२० ते एप्रिल २०२५ या कालावधी दरम्यान करंजाडे येथे पीडित पोलीस महिला राहत असलेल्या रूमवर तिच्यावर अत्याचार केला. चारचाकी गाडी घ्यायची असल्याने पीडित महिलेकडे पाच लाख रुपयांची मागणी केली आणि ते न दिल्यास त्यांचे अर्धनग्न फोटो त्यांच्या मुलाला दाखविण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडून दोन लाख रुपये ऑनलाईन आणि तीन लाख रुपये रोख स्वरूपात घेतले.
तसेच पीडित महिलेला जातीवाचक बोलून शिवीगाळ आणि अपमानास्पद वक्तव्य करून अपमान केला. पीडितेने याबाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षकाच्या आईला दिली असता तिने देखील जातीवरून शिवीगाळ केली आणि अपमान केला. त्यामुळे दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.