म्हसळा | जळगाव-पुणे-माणगावम्हसळा-दिघी या राष्ट्रीय महामार्ग क्रं. ऋ.७५३ वर माणगावहून म्हसळ्याकडे येत असताना १९ व्या कि.मी. मध्ये घोणसे घाटातील तीव्र वळण आणि शीघ्र उताराच्या अपघात प्रवण रस्त्यावर १७ मे रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास १६ चाकी अवजड टे्रलरला अपघात झाला.
धोयाच्या वळणावर समोरून येणारी एसटी बस अंगावर आल्याने अपघात झाल्याचे ट्रेलर चालक रोहीत लालाजी गौंड याने सांगितले. या घटनेची नोंद म्हसळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घोणसे घाट संघर्ष समितीने पाठपुरावा करून बांधलेल्या संरक्षक भिंतीमुळे प्राणहानी झाली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. २१ ऑटोंबर २०२२ रोजी खासदार तटकरे यांनी म्हसळा तालुयाच्या नियोजित दौर्यात घोणसे घाट अपघात स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली होती.
अपघात स्थळावर नेमया कोणत्या उपाययोजना आवश्यक, त्या सुधारणा करणेबाबत आपण विशेष पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार घाटातील अपघातप्रवण क्षेत्रात शून्य अपघात होतील याची दक्षता घेतली जाईल, असे एशासन देऊनही अद्यापही काहीही सुधारणा न केल्याने तसेच अपघाताचे स्वरूप गंभीर असतानाही पोलीस किरकोळ नोंद केली जात असल्यानेन, अपघातप्रवण क्षेत्राचा अभ्यास आणि शून्य अपघात होतीलच कसे? असा सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत.