महाड | करंजाडी येथे एसटी बस पलटी , चालक-वाहकासह सातजण जखमी

19 May 2025 16:36:26
 mahad
 
महाड | राज्य परिवहन मंडळाच्या पुणे स्वारगेट डेपोची विन्हेरे स्वारगेट बस स्वारगेटच्या दिशेने येताना १७ मे रोजी दुपारच्या सुमारास महाड तालुयातील करंजाडी गावच्या हद्दीत पलटी झाली. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि ही दुर्घटना घडली.
 
अपघातावेळी बसमधून एकूण १५ प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी निशी सुनील घाडगे वय ९, राहणार रुपवली महाड, सुजाता सुरेश यादव, सुरेश यादव, धनश्री सुरेश यादव सर्व राहणार विन्हेरे, महाड, कम्रूनिसा अहमद देवळेकर, राहणार भोमजाई, महाड यांच्यासह चालक मुरलीधर दिगंबर पोफळे राहणार भेकरेनगर, पुणे आणि वाहक जयश्री बाबू वाघमारे, राहणार सिंहगडरोड, पुणे असे सातजण या अपघातात जखमी झाले आहेत.
 
सर्व जखमीना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉटर शंतनू डोईफोडे यांनी दिली आहे. या अपघाताची नोंद महाड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0