कोकणचे विकासाचे स्वप्न लवकरच साकारणार-तटकरे , टोकेखार ते तुरुंवाडी पुलाच्या कामाची केली पाहणी

19 May 2025 12:43:50
 Murud
 
मुरुड | बॅ. अंतुले यांचे कोकणातील सागरी महामार्गाचे स्वप्न लवकरच साकार होईल, असा विश्वास खा.सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. या सागरी महामार्गातील अत्यंत महत्वाचा आणि दोन तालुक्यांना जोडणार्‍या टोकेखार ते तुरुंवाडी पुलाच्या कामाची शनिवारी (१७ मे) तटकरेंनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
 
समुद्रातील पुलांचे काम सुरु झाले असले तरी पूल दोन्हीकडे जोडला जाणार आहे त्या जागेचे हस्तांतरण होणे बाकी आहे. त्यात कोणतीही अडचणी येऊ नये म्हणून पुलाचा प्लॅन पाहून कमला कशी गती मिळेल? यासाठी मुंबईत तातडीची बैठक लावली आहे. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष फिरोज घरटे, मनोज भगत, हसमुख जैन, मृणाल खोत, स्मिता खेडेकर आदी उपस्थित होते.
 
करंजा ते रेवस आणि टोकेखार ते तुरुंवाडी हे सागरी महामार्गातील महत्वाचे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. टोकेखार ते तुरुंवाडी पुलामुळे मुंबईहून श्रीवर्धनला २ तासांत पर्यटक समुद्राचा आनंद घेत प्रवास करु शकतो. पर्यटनाच्या विकासात सागरी महामार्ग महत्वाची भूमिका साकारणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0