पाली/ वाघोशी | सुधागड तालुका हा वनीकरणाने विखुरला आहे. मोठ्या प्रमाणात जंगल भाग आहेत. यामध्ये सागाचे झाडांच्या अवैद्यरित्या तोंड करून साठवणूक करण्यात आली आहे. तालुयातील पेडली सर्वे नंबर ६/२/२, भालगुल येथील फार्म हाऊस, भारजेवाडी येथील सर्वे नंबर ४३८ व ३१२ या ठिकाणीसागांचे झाडांची वृक्षतोड करून मोठ्या प्रमाणात साठा आढळून आल्याचे सामाजिक कार्यकर्ते सागर मिसळ यांनी सांगितले.
याबाबतीत त्यांनी रीतसर अर्ज वनपरिक्षेत्र अधिकारी सुधागड यांच्याकडे केला आहे. सुधागडात मोठ्या प्रमाणे वृक्षतोड व सागाच्या झाडांचे अफरातफर होत असल्याचे निदर्शनास येऊनही वनपरिक्षेत्र अधिकारी कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही.
दरम्यान सागर मिसाळ यांनी कुठलीही कायदेशीर करू नये याकरिता त्यांना अनेक अनोळखी कॉल येत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच ते पुढे म्हणाले की अधिकारी व वृक्षतोडी करणार्यांच्या वैयक्तिक साठे लोटे असल्याचा संशय देखील मला येत आहे. दरम्यान वृक्षतोड करणार्यांवर कारवा तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
सागर मिसाळ यांनी केलेल्या अर्जाची रीतसर चौकशी करून नियमोचित कारवाई केली जाईल. -विशाल सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पाली