खा.धैर्यशील पाटील यांच्यावर दक्षिण रायगडची जबाबदारी , भाजप जिल्हाध्यक्षपदी पुन्हा निवड

By Raigad Times    17-May-2025
Total Views |
 pali
 
सुधागड-पाली | दक्षिण रायगड जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात मजबूत नेतृत्वाचा ठसा उमटवणारे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांची पुन्हा एकदा भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे.
 
पाटील यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी निस्वार्थपणे मेहनत घेतली असून, पक्ष मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक तसेच राजकीय योगदानामुळे दक्षिण रायगडमधील अनेक विकासात्मक उपक्रमांना वेग मिळाला, तसेच ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी प्रभावी निर्णय घेतले. धैर्यशील पाटील यांनी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत सातत्याने संवाद साधत, नव्या नेतृत्वाला संधी देत आणि समाजहिताच्या धोरणांना प्राधान्य देत पुढे वाटचाल केली आहे.
 
त्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण रायगडमध्ये अनेक उपक्रम,विकास योजना आणि सामाजिक कार्यांचे प्रभावी नियोजन करण्यात आले. त्यांनी राजकीय पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकीच्या तत्वावर प्रशासनाचा उपयोग करत जनतेशी निकट संबंध वाढवले. पाटील यांच्या पुनर्नियुक्तीमुळे कार्यकर्त्यां ध्ये आणि जनतेध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भविष्यातील राजकीय आणि विकासात्मक धोरणांना नवी दिशा मिळेल, असा विेशास व्यक्त केला जात आहे. पक्षाच्या गृहितकांप्रम ाणे त्यांनी केवळ राजकीय कार्यच नव्हे, तर सामाजिक कल्याणासाठीही प्रखर भूमिका बजावली आहे.