धरमतर ते अलिबाग, अलिबाग ते मांडवा, अलिबागरेवदंडा-मुरुड मार्गावर अवजड वाहनांना बंदी

17 May 2025 13:24:55
 alibag
 
नागोठणे | उन्हाळी सुट्ट्या असल्याने शनिवार व रविवारी जिल्ह्यात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होतात. परिणामी वाहनांची गर्दी वाढते. वाहतूक कोंडी होते. त्यामुळे १७ व १८ मे तसेच २४ व २५ मे या मे महिन्यातील तिसर्‍या आणि चौथ्या आठवड्यातील शनिवार व रविवारी स्थानिक नागरिक व पर्यटकांचा प्रवास सुखकर, सुरक्षित व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने धरमतर ते अलिबाग, अलिबाग ते मांडवा, अलिबाग-रेवदंडा-मुरुड मार्गावर अवजड वाहनांना बंदी केली आहे.
 
१७ व १८ मे तसेच २४ व २५ मे रोजी सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ -अ वर धरमतर ब्रिज ते अलिबाग तसेच अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग-रेवदंडा-मुरूड या राज्यमार्गावरील जीवनावश्यक वस्तु वगळून जड-अवजड वाहनांची वाहतूक बंदी करण्यात आली आहे.
 
रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याकारणाने आणि मे महिन्यात मुलांना शाळेला सुट्टी असल्याने पर्यटक हे मांडवा, किहीम अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरूड, दिवेआगर, श्रीवर्धन, महाड अशा पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात आपापली वाहने घेवून येत असतात.
 
सध्या मे महिन्याच्या पोर्शभूीवर विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याकारणाने पर्यटक हे रायगड जिल्ह्यामध्ये फिरण्याकरीता वेगवेगळ्या समुद्र किर्ना?यावरील बीचला भेटी देत असतात.त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असून त्यातच महामार्गावरील जड-अवजड वाहनाुंळे वाहतूक कोंडी होत आहे. वडखळ-अलिबाग हा रस्ता एकेरी रस्ता आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0