अलिबाग | रविवार, ११ मे २०२५ रोजी पाठारे क्षत्रिय अष्टागर समाज झिराड या संस्थेचा ६१ वा वर्धापन दिन ‘तपस्वी रामजी लक्ष्मण घरत’ समाज मंदिरातील पंढरीनाथ रघुनाथ तथा दादा पुरो सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शासकीय लेखा परीक्षक सुहास यशवंत म्हात्रे हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक जे.एस.एम कॉलेज अलिबागचे पंकज प्रकाश घरत, संस्थेचे अध्यक्ष सुबोध राऊत, उपाध्यक्ष गणेश पुरो, सचिव मोहन पाटील, खजिनदार विकास ह.पाटील, सहसचिव श्रीकांत ठाकूर, सदस्य नवीन राऊत, विकास ना. पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे खजिनदार विकास ह. पाटील यांनी केले, तर संस्थेची आर्थिक वर्षाची वाटचाल, तसेच उपस्थितांचे आभार संस्थेचे सचिव मोहन पाटील यांनी सादर केली.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेने यावर्षी देखील अष्टागरातील विशेष कामगिरी करणार्या समाज बांधवांचा विशेष सत्कार केला. त्यांत अॅड. अिेशनी घरत यांची नोटरीपदी नियुक्ती झाल्याबद्दल, एच आर फिटनेसचे सर्वेसर्वा ऋषिकेश राऊत याची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल, विपिन राऊत यांनी राज्यस्तरीय संविधान व्हिडिओ सादरीकरण केल्याबद्दल, मापगाव येथील समाज बांधव जगदीश पाटील यांनी ११० वेळा गिरनार वारी व ८ वेळा गिरनार परिक्रमा केल्याबद्दल सर्वांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कारे करण्यात आला. तसेच इयत्ता १० वीमध्ये ७५ टक्क्यांच्या पुढे व इयत्ता १२ वीमध्ये ७० टक्क्यांच्या पुढे गुण मिळवून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.