खोपोली | गेल्या आठवड्यांपासून दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. दिवसभर कडक ऊन व अचानक दुपारी तीन ते चारनंतर पडणारा पाऊस स्थिती आहे. खोपोली शहरातील रस्त्यावरांवर पाणी साठत असतानाच १४ मे रोजी संध्याकाळी ४ वाजता मुसळधार अवकाळी पाऊस पडल्यामुळे शास्त्री नगर हद्दीतील गिरनार बिल्डींगसमोरील गटार तुंबून रस्त्यावर तळे बनले होते.
पहिल्याच पावसात खोपोली नगरपालिकेच्या नालेसफाईचा फज्जा उडाल्याची चर्चा सुरू आहे. शहारातील शास्रीनगर परिसरातील युनियन बँक, गिरनार बिल्डींग आदी भागातील राहिवाशांचे सांडपाणी वाहून नेण्यासाठी महामार्गालगत असलेले हे मुख्य गटार आहे. पावसाळ्यात दरवर्षी गटारातील सांडपाणी रस्त्यावर साठल्यावर गिरनार बिल्डिंगच्या पार्कींगमध्ये, भाऊ कुंभार चाळीत पाणी जाते यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. पहिल्याच पावसात रस्त्यावर उडघाभर पाणी साठले असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.