पुणे | भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या एसटीच्या स्मार्ट बसेस घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. नुकतंच एसटी प्रशासनाने नव्या ३ हजार बसची खरेदी केली.
या खरेदीच्या अनुषंगाने बोलावलेल्या बस बांधणी कंपन्यांच्या बैठकीत ते बोलत होते. नवीन लालपरीसह येणार्या सर्व बसेसमध्ये ए. आय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, जी.पी.एस. तंत्रज्ञान एल.ई. डी, टीव्ही, वाय-फाय, चालक ब्रेथ अॅनालाइज यंत्रणा, याबरोबरच चोरीप्रि तबंध तंत्रज्ञानावर आधारित बस-लॉक सिस्टम असे आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीने लावण्यात येणार असून या बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी असतील, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
स्वारगेट बसस्थानकावरील घटनेच्या पोर्शभूीवर प्रवाशांच्या सुरक्षेला यापुढे अत्यंत महत्त्व दिले जाणार आहे. प्रवासात बसेसम ध्ये प्रवाशांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच चालकाच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवर देखील या कॅमेराचा तिसरा डोळा लक्ष ठेवून असणार आहे. तसेच बसस्थानक व परिसरामध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसेस देखील पूर्णतः बंद राहतील, अशी यंत्रणा बसमध्ये बसविण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.
एल.ई.डी. टीव्ही लावण्यात येणार
नवीन बसेसमध्ये लावण्यात येणार्या एल.ई.डी. टीव्ही च्या माध्यमातून जाहिराती बरोबर विविध महत्त्वाच्या घडामोडी तसेच सन्माननीय पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे संदेश तातडीने प्रवाशांच्या पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासात देखील प्रवासी जगभरातील घडामोडी बाबत अपडेट राहतील.
तसेच बसच्या बाहेरील बाजूस देखील जाहिरात प्रसिद्धी करीता एल.ई.डी पॅनल लावण्यात येणार आहे. यातून महामंडळाचा जाहिरात महसूल वाढण्यास मदत होणार आहे. सध्या तापमान वाढीमुळे एसटी बसेसला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या आगीला प्रतिबंध करण्यासाठी फो बेस आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येणार आहे. बसमध्ये ज्या ठिकाणी आग प्रज्वलित होईल, त्याचा शोध घेऊन त्या ठिकाणी संबंधित फो वापरून आग तात्काळ शमवण्याची व्यवस्था या यंत्रणेत करण्यात आली आहे.
या आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा सुरक्षिततेबरोबरच बसच्या अपघातांची संख्या कमी करणे, तसेच बस फेर्यांचा वक्तशीरपणा वाढवणे यासाठी देखील मदत होणार आहे. त्यामुळे भविष्यात खर्या अर्थाने एसटी स्मार्ट होईल, असा विेशास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.