म्हसळा | महामार्गांवर मोकाट गुराुंळे होणार्या अपघातांचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर अशाच एका अपघातात म्हसळा तालुयातील घोणसे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश धोंडू कानसे (वय ४८) गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी (१५ मे) त्यांचे निधन झाले. १२ मे रोजी सरपंच रमेश कानसे हे गावची मिटींग आटोपून बुलेट गाडीने म्हसळा शहरातील निवासस्थानी परतत होते.
दिघी पुणे राष्ट्रीय म हामार्गावरील म्हसळा ढोरजे फाटालगत रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या गाडीची गाईला ठोकर लागली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना म्हसळा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पनवेल येथील अपोलो रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी (१५ मे रोजी) सरपंच रमेश कानसे यांचे सकाळी निधन झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महिला चिटणीस माजी सरपंच रेश्मा कानसे यांचे रमेश कानसे हे पती आहेत. मागील आठ वर्षे पती पत्नी घोणसे ग्रुप ग्रामपंचायतीवर लोकप्रतिनिधीत्व करत होते. मात्र कानसे यांचे अपघाती निधन झाल्याने म्हसळा तालुयात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, दोन भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. कानसे यांच्या अंत्ययात्रेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.