दोन विविध अपघातात दोघांचा मृत्यू; ९ जखमी , महाड, पोलादपूर येथील घटना

By Raigad Times    15-May-2025
Total Views |
 mahad
 
महाड / पोलादपूर । महाड आणि पोलादपूर येथे मंगळवारी झालेल्या दोन विविध अपघातांम ध्ये दोघांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत. कापडे बुद्रुक हद्दीत झालेल्या मोटारसायकल अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. दुसऱ्या घटनेत महाड विन्हेरे मार्गावर विक्रम रिक्षा आणि आयशर टेम्पोची धडक होऊन एकाचा मृत्यू तर ८ प्रवासी जखमी झाले.
 
चोळई येथील दोन तरुण मंगळवारी (१३ एप्रिल) मोटरसायकलने महाबळेश्वर रस्त्यावरील कापडे बुद्रुक भागातून परत येत होते. कापडे बुद्रुक हद्दीतील हॉटेल श्रद्धा समोरील रस्त्यावर अचानक पोलादपूर बाजूकडून एक वाहन मोटरसायकलवरील आल्याने राज विनोद कदम (१७ वर्षे) याने गाडीवरून उडी मारली. मोटारसायकलस्वार यामुळे आदित्य सतीश पवार याचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी साईड पट्टीच्या दिशेने गेली.
 
mahad
 
पोलादपूर तालुक्यातील यावेळी राज कदम याचा जागीच मृत्यू झाला तर आदित्य पवार हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत आणि जखमीला पोलादपूर  रुग्णालयामध्ये दाखल केले. याप्रकरणी पोलीस हवालदार नितेश कोंढाळकर हे साहेब पोलीस निरीक्षक आनंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. दुसरी घटना महाड विन्हेरे मार्गावर मंगळवारी सायंकाळी घडली.
 
आयशर टेम्पो आणि विक्रम रिक्षा यांची समोरासमोर झालेल्या भीषण मंथन रविंद्र भिलारे (वय १३ अपघातात रा. शिरवली) याचा मृत्यू झाला आहे. तर आठजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
जखमींमध्ये श्रीयशी अभिषेक रेडीज (वय ३७), श्रीकांत विठोब म्हसुलकर (वय ६५), सुधीर गंगाराम गीजे (वय ३९) सर्व रा. विन्हेरे, राजेंद्र सखाराम भिलारे (वय ३५, रा. शिरवली), अर्चना रुपेश धोत्रे (वय २७, रा. म हाड), रियांश अभिषेक रेडीज (वय ७, रा. दहीसर), श्रध्दा श्रीकांत म्हसुलकर (वय ६०, रा. विन्हेरे) यांचा समावेश आहे. या अपघाताची नोंद महाड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास सुरु आहे.