खोपोली | हळदी समारंभात महिला, मुली असल्याने कपडे काढून नका, असे सांगण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण सुरु असताना मध्यस्थी करायला गेलेल्या इसमाला लोखंडी कालथ्याने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा जखमी झाला आहे. याप्रकरणी केळवली रेल्वे स्थानकावरून एकाला अटक करण्यात आली तर एकजण फरार आहे.
याप्रकरणी जखमी विलास वाघमारे याने खोपोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीड जांबरुंग आदिवासीवाडीतील कुमार विकास पवार याचा हळदी समारंभ १२ मे रोजी होता. हळदी समारंभात नाचताना बाळू ( बिंट्या) मुखणे (वय २८), प्रकाश पवार (वय २२) हे कपडे काढून नाचत असल्याने शेजारी राहणारे विलास गोपाळ वाघमारे (वय ४२) हे हळदी समारंभात महिला, मुली असल्याने कपडे काढून नका असे सांगायला गेले.
त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. त्यानंतर दोघांनी विलासला बाजूला घेऊन लोखंडी कालथ्याने डोयात मारले. यामध्ये विलासच्या डोयाला दुखापत झाली. भावाला मारत असल्याचे बघून अनंता गोपाळ वाघमारे (वय ३८) हा वाचविण्यासाठी गेला असताना दोघांनी अनंता याच्या पाठीवर आणि छातीवर लोखंडी कालथ्याने मारले.
गंभीर दुखापत झाल्याने अनंता जमिनीवर कोसळला. त्याला खोपोली नगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात उपचारासाठी आणत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉटरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक शीतल राऊत, पोलीस हवालदार सागर शेवते रूग्णालयात पोहचले. त्यानंतर सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.