प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या , परळी येथील नर्सिंग हो मधील थरारक घटना

15 May 2025 19:43:29
pali
 
सुधागड | प्रेयसी टाळत असल्याने संतापलेल्या प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीची कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या केली. नंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रेयसीच्या बाजूला त्याने गळफास घेऊन स्वतःचेही जीवन संपवले. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता ही घटना समोर आली. परळी येथील डॉ. कल्पेश ओसवाल यांच्या राजेश पॉलीलिनिक अँड नर्सिंग हो दवाखाना येथे ही घटना घडली आहे.
 
प्रेयसी टाळत असल्याच्या रागातून शेखर संतोष दुधाणे (वय २६, रा. दुधाणेवाडी, ता. सुधागड) याने नर्सिंग हो येथे जाऊन नर्स म्हणून काम करणार्‍या पोर्णिा अनंता देसाई (वय २२, रा. देसाईपाडा, ता. सुधागड) हिच्या मनगटावर व गळ्यावर कोयत्याचे वार करून हत्या केली. त्यानंतर त्याने रुममधील बेडशीटने पंख्याला गळफास लावून स्वतःलाही संपवले. ही घटना समजताच जांभूळपाडा, पाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.
 
पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावेळी दवाखान्याबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पाली खोपोली राज्य महामार्गांवर परळी येथे कोंडी झाली होती. दरम्यान, स्थानिक, नागरिक व पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले व वाहतूक सुरळीत करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुयातील परळी येथे धक्कादायक घटना घडलीय. एका तरुणाने प्रेयसीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वतःला गळफास घेत आत्महत्या केली.
 
या घटनेनं सुधागड तालुयात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून घटनेच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. पौर्णि ा अनंत देसाई (वय अंदाजे २५), ही तरुणी या दवाखान्यात नर्स म्हणून काम करत होती. ती देसाईपाडा, सुधागड येथील रहिवासी होती. तिचे शेखर संतोष दुधाणे (रा. दुधाणेवाडी, सुधागड) या तरुणासोबत प्रेसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांध्ये वाद सुरू होते.
 
 
Powered By Sangraha 9.0