मुंबई | राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची आज बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत कृत्रिम वाळू धोरणाविषयी मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पर्यावरण नुकसान टळणार आहे. तर वाळूच्या माध्यमातून ग्रामीण भागात पसरलेल्या गुंडगिरी आणि वाळू माफियाना मोठा दणका बसला आहे.
रस्त्यावर राहणार्या अथवा भटकंती करणार्या बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी पण धोरण आखण्यात आले. राज्यातील शासकीय आयटीआयचे सार्वजनिक-खाजगी भागिदारीतून अद्ययावतीकरण धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. राज्य वेतनत्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत करण्यात आला आहे. इतर ही काही धडाडीचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले आहे.
हे आहेत मंत्रिमंडळ निर्णय
१) रस्त्यावर राहणार्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरते पथक योजनेस मान्यता. २९ महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात ३१ मोबाईल व्हॅन, यासाठी सुारे ८ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. (महिला व बालविकास विभाग)
२) नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पबाधितांना ‘हो स्वीट हो’ अंतर्गत वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्ट्याच्या दस्तऐवजास मुद्रांक शुल्क कमी करुन केवळ एक हजार रुपये आकारणार आहे. (महसूल विभाग )
३) कृत्रिम वाळू (एम-सँड) धोरणास मंजुरी - प्रत्येक जिल्ह्यात ५० व्यक्ती/ संस्थांना एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योगविभाग सवलती देणार, एम- सँड तयार करर्णाया युनिटला २०० रुपये प्रतिब्रास इतकी सवलत देणार. पर्यावरणाची हानी टळणार आहे.