पनवेल | रायगड जिल्ह्यामध्ये एकेकाळी तुल्यबळ आणि प्रमुख समजल्या जाणार्या शेतकरी कामगार पक्षाची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली आहे. अलिबाग येथील दणयानंतर पनवेल उरण मध्ये पक्षाला मोठ्या प्रमाणात ओहोटी लागली आहे, आणि भारतीय जनता पक्षात महाभरती सुरू झाली आहे.
जे. एम. म्हात्रे आणि त्यांचे पुत्र प्रीतम आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्या खांद्यावरील लालबावटा काढत हातात कमळ घेतल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अगोदरच भाजपचे पारडे जड झाले आहेत.२००४ ला माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी शेतकरी कामगार पक्षाला रामराम ठोकला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा लाल सलाम केला.
त्यानंतर २१ वर्षांनी पनवेल उरण मध्ये जे. एम. म्हात्रे यांनी लालबावट्याशी काडीमोड घेतली. त्यांचे पुत्र आणि पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजप प्रवेश केला. त्यामध्ये माजी नगरसेवकांची संख्या सुद्धा जास्त आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत शेकाप कडून निवडणूक लढवण्यास इच्छुकांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरली आहे.
यामुळे तुल्यबळ आणि तगडे उमेदवार पक्षाला मिळतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या व्यतिरिक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बरोबर ग्रामपंचायत या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेत पनवेल तालुयात लालबावट्याचा सातत्याने प्रभाव राहिला. परिणामी रायगड जिल्हा परिषदेत सत्ता अबाधित राहिली. पनवेल तालुका पंचायत समितीतही अनेक वर्ष शेकापचा झेंडा फडकत राहिला.
मात्र १० मे २०२५ रोजी झालेल्या महापक्ष प्रवेशामुळे या ठिकाणी सुद्धा आता भाजपचे कमळ फुलवण्यासाठी एक प्रकारे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. जे .एम .म्हात्रे यांची ताकद सुद्धा या पक्षाकडे आली आहे. पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रायगड जिल्ह्यात गेल्या एक-दीड महिन्याम ध्ये अलिबाग आणि पनवेल मधील शेतकरी कामगार पक्ष अक्षरशा खिळिखळा केला आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजप नंबर एक कडे म ार्गक्रमण करत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
यांनी धरली भाजपाची वाट!
शेकापचे जिल्हा चिटणीस गणेश कडू,उपाध्यक्ष रवी पाटील, वहाळचे माजी सरपंच पांडु घरत, ज्येष्ठ नेते हरचंदसिंग सग्गू, रघु घरत, मनु कांडपिळे, तालुका सहचिटणीस जितेंद्र म्हात्रे, पुरोगामी युवक संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, लाल ब्रिगेड तालुकाध्यक्ष रमाकांत पाटील, प्रकाश जितेकर, माजी नगरसेविका अनुराधा ठोकळ, माजी नगरसेविका सुरेखा मोहोकर, प्रिती जॉर्ज म्हात्रे, अरुणा दाभणे, सारिका भगत, पुष्पलता मढवी, कुसु पाटील, रेणुका मोहोकर, प्रार्थना वाघे, मंजुळा कातकरी, माजी नगरसेवक रवींद्र भगत, सुनिल बहिरा, गणेश पाटील, डी. पी. म्हात्रे, आकाश ठोकळ,माजी जिल्हा परिषद सदस्य राजु पाटील, जीवन म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्या पार्वती पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती निशा ठाकूर, माजी उपसभापती जगदीश पवार, सीमा घरत, भात गिरणी सहकारी संस्था उपसभापती राजेंद्र घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील, करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेेशर आंग्रे, वहाळचे माजी सरपंच बाळाराम पाटील, अरुण दापोलकर, सुनील पाटील, गणेश पाटील, गव्हाणच्या माजी सरपंच माया भोईर, सचिन घरत, एल.एल. पाटील, कोळखे ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनल म्हात्रे, उषा अजित अडसुळे, कनार्ळा माजी सरपंच सुषमा पाटील, मानघर सरपंच राजेंद्र पाटील, वावेघर सरपंच गीतांजली गाताडे, तुराडे सरपंच रिया माळी, गुळसुंदे उपसरपंच अरुणा पाटील, माजी सरपंच आर. डी. पाटील, गुरुनाथ माळी, सदस्या काव्या जोशी, दीपाली जगताप, अभिजित पाटील, यांच्यासह शेकापच्या हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते.
भाजपने शेकापची शिट्टी वाजवली!
शिट्टी चिन्हावर शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यामध्ये निवडणूक लढला. चारही विधानसभा मतदार संघामध्ये उमेदवारांना हेच चिन्ह देण्यात आले होते. विशेष करून उरण मध्ये प्रीतम म्हात्रे यांनी आमदार महेश बालदी यांना टक्कर दिली. मात्र त्यांना विजयापर्यंत पोहोचता आले नाही.
दरम्यान या पराभवाचे खापर महाविकास आघाडीवर फुटले. म्हात्रे पिता-पुत्रांनी यातून बाहेर पडण्याचा आग्रह धरला. चार महिन्यातच शेकापची शिट्टी भाजपाने वाजवत मोठा धक्का दिला.