करंजा येथे एलईडी बोटींवर कारवाइ , थ्री फेज जनरेटर ४ हजार, ३ हजार वॅट एलईडी बल्ब जप्त

By Raigad Times    12-May-2025
Total Views |
 uran
 
उरण | बंदी असतानाही करंजा बंदर परिसरात एलईडी पद्धतीने मासेमारी करणार्‍या दोन बोटींवर मत्स्यव्यवसाय विभागाच्या परवाना अधिकार्‍यांनी ९ मे रोजी छापा टाकून कारवाई केली. यावेळी दोन बोटीवरील थ्री फेज जनरेटर ४ हजार, ३ हजार वॅट एलईडी बल्ब जप्त करण्यात आले आहे.
 
केंद्र आणि राज्य सरकारची एलईडी पद्धतीने मासेमारी करण्यास बंदी असतानाही अनेक मासेमारी बोटी या एलईडी तंत्राचा वापर करून खोल समुद्रात मत्स्यव्यवसाय आयुक्तालयाच्या अधिकारी वर्गाच्या आशिर्वादाने मासेमारी करतात. या एलईडी पद्धतीने मासेमारी करताना मोठया माशा बरोबरच लहान जीवही पकडले जातात. लहान मासे मृत झाल्याने त्यांची पैदास होणे थांबते आणि याच मुळे अनेक माशांच्या जाती हया नष्ट झाल्या आहेत.
 
यामुळे शासनाने एलईडी मासेमारीला बंदी घातली आहे. मात्र बंदी घातली असताना करंजा बंदर परिसरात मत्स्यव्यवसाय विभागाच्या कुपा आशिर्वादाने मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू आहे. सध्या पाकिस्तान व भारत देश यांच्यात युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीस, कस्टम यंत्रणेने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून समुद्रात गस्त वाढविल्याने संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी मासेमारी करणार्‍या बोटीवर छापा टाकला.
 
पेण दादर येथील अनिल जोशी यांची विठ्ठल माऊली IND-MH-7-MM-1941 या नौकेची तपासणी केली असता एक जनरेटर ३ फेज व पाण्यातील एलईडी बल्ब २ हजारचे दोन व पाण्यातील ४ हजारचे दोन बल्ब हे साहित्य आढळून आले. उरण करंजा कोंढरीपाडा येथील माऊली तुळजाई एकविरा IIND-MH-7-MM-3184 यांच्या नौकेची तपासणी करून एक जनरेटर ३ फेज, पाण्यातील एलईडी लाईट-चार जप्त करण्यात आले आहे. सदर जप्त करण्यात आलेल्या बोटी करंजा बंदरात ठेवण्यात आल्या आहेत.
गस्तवर असताना दोन बोटीवर कारवाई केली आहे एक पेण दादर आणि उरण करंजा येथील आहे त्या बोटी करंजा बंदरात ठेवण्यात आल्या. जप्त केलेले सामान अलिबाग येथे नेण्यात आले. त्याचे प्रस्ताव तयार करून मत्स्य उपायुक्तांकडे पाठवला आहे. -सुरेश बागुलगावे परवाना अधिकारी उरण मत्स्यव्यवसाय विभाग