सुधागड-पाली | वाकण पाली राज्य महामार्गावर पालीतील अंबा नदी पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर इंजेशन, सलाईन, नळ्या, इंजेशनच्या रिकाम्या बाटल्या, इंजेशन सुई व इतर वैद्यकीय कचरा २८ एप्रिल रोजी सायंकाळी पडलेला आढळून आला आहे.
ही घटना समोर येताच स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. हा वैद्यकीय कचरा अज्ञात व्यक्तींनी अंबा नदी पुलाजवळ रस्त्यावर फेकून दिला आहे. या परिसरातून वाहने, प्रवासी, नागरिक व गुरेढोरे ये-जा करतात.
परिणामी या कचर्यामुळे संसर्गजन्य रोग पसरण्याचा तसेचइंजेशन सुई व काचेच्या बाटल्या पायात घुसून जखमी होण्याचा धोका वाढला आहे. एखाद्या वाहनाचा टायर देखील पंचर होऊ शकतो. विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर असे कचरा उघड्यावर टाकला जाणे अत्यंत घातक ठरू शकतो, कारण पावसामुळे हे दूषित पदार्थ नदी पाण्यात मिसळून जलप्रदूषण घडवू शकतात.
स्थानिकांचा रोष
स्थानिक नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त करत प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. सार्वजनिक ठिकाणी असा कचरा फेकणे म्हणजे जनतेच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. हे नेमके कोणत्या हॉस्पिटलमधून किंवा लिनिकमधून आले, याची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पर्यावरणावर परिणाम
अशा हलगर्जीपणे फेकण्यात आलेला वैद्यकीय कचरा जैवविविधतेलाही धोका निर्माण करू शकतो. परिसरातील जनावरांना किंवा लहान मुलांना या कचर्याचा संपर्क आल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. त्याचबरोबर स्थानिक जलस्रोत दूषित होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कचरा नाही
या घटनेची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉटर शशिकांत मढवी यांना देण्यात आली. मात्र त्यांनी सांगितले की, येथे टाकण्यात आलेला कचरा हा आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा किंवा उपकेंद्राचा नाही. आमच्या इथे कचर्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येते.
सदर वैद्यकीय कचरा कोणी टाकला याबाबत माहिती नाही. पालीतील प्रत्येक दवाखान्याने व डॉटरांनी वैद्यकीय कचर्याचे सुरक्षित व्यवस्थापन करावे. मात्र जर कोणी वैद्यकीय कचरा उघड्यावर किंवा इतर ठिकाणी टाकताना आढळले तर त्यांच्यावर योग्य कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच तातडीने हा कचरा हटवून, संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन कडक कारवाई केली जाईल. -प्रणाली सूरज शेळके, नगराध्यक्षा, पाली