पेण | दिवा-सावंतवाडी ही बंद केलेली रेल्वे गाडी पुन्हा पेण रेल्वे स्थानकात थांबविण्यात यावी, अशी मागणी पेणकरांच्यावतीने करण्यात आली आहे. कोरोना काळापासून दिवासाव ंतवाडी, दादर-रत्नागिरी या रेल्वे गाड्या पेण रेल्वे स्थानकात थांबत नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. दर महिन्याच्या दुसर्या व चौथ्या रविवारी पेण प्रवासी संघ आढावा बैठक घेत आहेत.
यावेळी संघाचे प्रमोद जोशी, निलेश देसाई, विकास दातार, जोगळेकर व सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे उपस्थित होते. पेण स्थानकात थांबण्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र, अद्यापही रेल्वे प्रशासनाने त्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, ३० एप्रिल २०२५ रोजी मुंबई येथे होणार्या मध्य रेल्वे व मुंबई मंडळ अंतर्गत स्थानिक खा.धैर्यशील पाटील यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.