एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका , मेडिक्लेम योजना, हॉटेल थांब्यासाठी नवे धोरण; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

By Raigad Times    29-Apr-2025
Total Views |
 st
 
मुंबई | एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजना करता, एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी. असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. तसेच मेडिक्लेम आणि हॉटेल थांब्यासाठी नवे धोरण तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
 
सोमवारी एसटीच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, सुमारे १० हजार कोटी संचित तोटा सहन करणार्‍या एसटी महामंडळाला कर्मचार्‍यांचे वेतन, वाहन खरेदी, टायर खरेदी, इंधन खरेदी, स्थानकाचे नूतनीकरण व आस्थापना खर्चासाठी आर्थिक कसरत करावी लागते.
 
‘कॅशलेस मेडिक्लेम’ योजना धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने सुरू करावी, असे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी एसटी प्रशासनाला दिले. लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये एसटी बसेस ज्या हॉटेल-मोटेलवर थांबतात, तेथे प्रवाशांना दिल्या जाणार्‍या सेवा सुविधा बाबत तक्रारी निर्माण होतात त्यामुळे या बाबत नवे धोरणात करण्यात येईल, अशी माहिती सरनाईक यांनी यावेळी दिली.