अलिबाग झालखंड येथे स्विमिंग पूलमध्ये बुडून दोन वर्षीय मुलीचा मृत्यू

26 Apr 2025 17:54:04
 alibag
 
अलिबाग | अलिबाग तालुक्यातील झारखंडजवळील एका रिसॉर्टमधील स्विमिंग पुलमध्ये बुडून दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. अतिक्षा सुरेंद्रकुमार दास असे या मुलीचे नाव आहे.
 
झारखंडमधील एका रिसॉर्टमधील कामगाराची मुलगी होती. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पाण्याचे टँकर आल्याने तो कामगार अतिक्षाला सोडून टँकर पाहण्यासाठी गेला होता.
 
दरम्यानच्या काळात ही मुलगी स्विमिंग पूलमध्ये पडली. तीचे वडील आल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी अतिक्षाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत असल्याचे घोषित केले.
 
 
Powered By Sangraha 9.0