म्हसळ्यात बिबट्याची दहशत , रेवली येथे गोठ्यातील वासराचा फडशा
By Raigad Times 26-Apr-2025
Total Views |
सुधागड-पाली | म्हसळा तालुक्यातील रेवली येथील गरीब शेतकरी प्रतिभा प्रकाश पदरत यांनी त्यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाईच्या वासरावर बिबट्याने नुकताच हल्ला करुन वासरावर हल्ला केला. या प्रकाराने तालुक्यातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रतिभा पदरात यांनी आपल्या गोठ्यात गुरे बांधून ठेवली होती.
मध्यरात्री अचानक गावात बिबट्या आला आणि गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करुन वासराला खाऊन टाकले. प्रतिभा पदरत या सकाळी वाड्यात गेल्यावर ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी ही बाब पोलीस पाटील, अनंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. पोलीस पाटील यांनी म्हसळा वनविभाग कार्यालयास जाऊन सदरची घटना अधिकार्यांना सांगून चौकशी व पंचनाम्याची मागणी करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी विनंती केली.