अलिबाग | अलिबाग बाजारपेठेतील हिरा भरत स्वीट मार्टला शुक्रवारी आग लागली. अलिबाग नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या भीषण आगीमध्ये मोठी वित्तहानी झाली आहे. हिरा भरत स्वीट मार्ट या दुकानाला सकाळी आग लागली. आग लागलेल्या दुकानाच्या लागूनच अनेक दुकाने आहेत. मात्र अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.