नवी मुंबई | वृक्षांची खिळे ठोकून हानी करणार्यांवर तसेच विद्युत रोषणाई करुन त्यांना इजा पोहचविणार्या हॉटेल मालकांवर नवी मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
तुर्भे येथील दोन हॉटेल मालकांना दंड ठोठावला आहे. तुर्भे, सेक्टर १८ येथील नानुमल हॉटेल व सेक्टर १९ येथील हॉटेल देवीप्रसाद यांच्या माध्यमातून त्यांच्या हॉटेल बाहेरील झाडांवर विद्युत रोषणाई केली असल्याचे आढळून आल्याने तुर्भे विभाग कार्यालयाच्या भरारी पथकाने तुर्भे विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली, उद्यान विभाग परिमंडळ १ चे उपायुक्त किसनराव पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, या दोन्ही हॉटेल मालकांना प्रत्येकी १० हजाराची दंडात्मक करण्यात आली.
वृक्षांवर खिळे ठोकणे, विद्युत रोषणाई करणे व वृक्षास इजा पोहचविणार्या व्यक्ती, संस्था, व्यावसायिक यांचेवर दंडात्मक कारवाई करणेबाबत निर्णय महापालीकेकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार सदरची कारवाई करण्यात आली आहे.