उरण | उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक किरण केणी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी दली. नागाव ही उरण तालुक्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची ग्रामपंचायत मानली जाते.
मात्र याच गावात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या होत्या. तक्रारदारांना न्याय मिळत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या दारात धाव घेतली. अखेर त्यांनी ग्रामसेवक किरण केणी यांचे निलंबन करण्यात आले आहे.